आदर्श ग्रंथपाल म्हणून सूर्यकांत जाधव यांची निवड
बी डी उबाळे
औसा: सूर्यकांत कमलाकर जाधव ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय आलमला ता. औसा जि लातुर यांची कै. मारोती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड झालेचे पत्र दिले आहे. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा के मारोती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनिय (उत्कृष्ट) कार्य केल्याबद्दल २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड समितीने हि गुणांकनानुसार निवड केलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख, वेळ व ठिकाण आपणास लवकरच कळवण्यात येईल असे पत्र आलमला येथील ग्रंथपाल सूर्यकांत जाधव यांना नुकतेच देण्यात आलेले आहे.
0 Comments