Latest News

6/recent/ticker-posts

बळीराजा साहित्य संमेलन पूर्वतयारी प्रारंभ वृक्षारोपण करुन

बळीराजा साहित्य संमेलन पूर्वतयारी प्रारंभ वृक्षारोपण करुन


शिरूर अनंतपाळ: जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र आणि शब्द पंढरी प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 एप्रिल 2023 रविवार रोजी उजेड येथे संपन्न होणाऱ्या बळीराजा साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ संमेलनस्थळी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव बालाजी जाधव उजेडकर यांच्या उपस्थितीत स्थानिक संयोजन समितीच्या पुढाकाराने वृक्षारोपण करुन करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक संयोजन समिती सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हे संमेलन सर्वार्थाने अविस्मरणीय करण्याचा संकल्प संयोजन समितीने केला. या बळीराजा साहित्य संमेलनात या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बालाजी जाधव, उजेडकर यांनी केले. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे व शब्द पंढरी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असून ग्रामीण भागातील हे संमेलन ऐतिहासिक ठरावे अशी संयोजकांची भूमिका दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments