भादा जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; फळे खाऊ... निरोगी राहू...
बी डी उबाळे
औसा: भादा जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. फळे खाऊ... निरोगी राहू... असा उपक्रम सोमवार दि 10 एप्रिल 2023 रोजी शालेय पोषण आहार योजना अंतर्गत पूरक आहार ऐवजी उन्हाळ्याची तीवृता लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशाला भादा व जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा या दोन्ही प्रशालेतील इयत्ता 1 ली ते 9 वी च्या सर्वच विद्यार्थ्यांना (इ 10 वी चे SSC परीक्षा संपल्या मूळे) पाणीदार,गोड लाल टरबूज वाटप करण्यात आले.
पूरक आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना टरबूज वाटप करण्याची संकल्पना, प्रेरणा व अमलातही आणण्यासाठी पुढाकार हे इस्माईल मुलानी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मूळे साध्य झाली. या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी व पालक यांनी आनंद व्यक्त केला व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व समिती सदस्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन माकणे व सर्व शिक्षकांनी या अभिनव उपक्रमा बद्दल अभिनंदन केले.
या सगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन होण्यासाठी या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या वातावरणातील उष्णते करिता नक्कीच फायदेशीर ठरेल अशी अपेक्षाही यावेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
0 Comments