Latest News

6/recent/ticker-posts

मेंडपाळ पालकाच्या हुशार मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून दिली सायकल भेट: समाजसेवी कांबळे दाम्पत्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन

मेंडपाळ पालकाच्या हुशार मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून दिली सायकल भेट: समाजसेवी कांबळे दाम्पत्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन


बी डी उबाळे 

औसा: औसा तालुक्यातील आनंदनगर, भादा येथील रहिवासी तथा शाळेमध्ये शिक्षण घेनाऱ्या विद्यार्थ्याचे  पालक सौ.जयश्री-परमेश्वर सूर्यकांत कात्रे यांची मुलगी ऋतुजा ही शाळेतील बेस्ट ऑफ स्टुडन्ट आहे. आणि तिच्यासोबत कु.विद्या, कु.सुजाता आणि कु.जान्हवी या बहिणी याच शाळेत शिक्षन घेत असून त्याही गुणवान आहेत. ऋतुजाला कांबळे दांपत्याकडून सायकल भेट देण्यात आली. त्याच बरोबर या चारही मुलींचा शिक्षण सुरू आहे तोपर्यंतच संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचा क्रांतिकारी आणि मानवतावादी निर्णय याच शाळेत आपले कर्तव्य आणि ज्ञानार्जनाचे काम बजावत असणारे कांबळे शिक्षक पती-पत्नीने दिं 27 एप्रिल 2023 रोजी घेतलेला हा अतिशय समाजसेवी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा निर्णय आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या विद्यार्थिनी पुढे आले आहेत. त्यांचे पालक गेली 7 वर्ष 300 मेंढ्या सोबत घेऊन सोलापूर, माळशिरस, संपूर्ण मांजरा पट्टा, मुरूम, आष्टी या भागात शेत वावरात राना वनात, पाऊस, ऊन, वारा याची तमा न बाळगता कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवता याव्या म्हणून हे सर्व कष्ट सहन केले आहे. 



आणि चारही मुलींचे शिक्षण पालकाच्या आर्थिक अडचणीमुळे थांबू नये असे कांबळे शिक्षक शिक्षिका या दापत्याला वाटले म्हणून हा निर्णय त्यांनी चर्चा करून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक मानधने आणि त्यांच्या पालकाच्या परवानगीने तसेच शाळेतील शिक्षक सहकार्याच्या समवेत घेतलेला आहे. तसेच परमेश्वर सूर्यकांत कात्रे यांना उत्कृष्ट पशू पालक म्हणून पशु पुरस्कारही मिळालेला आहे आणि त्यांच्या कष्टाला फळ या मुलींच्या माध्यमातून मिळावे ही अपेक्षा या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. "आम्ही घेतलेला निर्णय खूपच समाधानकारक वाटला." "मुलगा मुलगी एक समान, देऊ आपण त्यांना सन्मान" या ओळीप्रमाणे मुला-मुलींमध्ये भेद न मानता या तत्त्वाला अनुसरून सर्वांनी राहावे हा संदेश या ठिकाणी मला द्यावासा वाटतो असा संदेश या प्रसंगी शिक्षकानी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले आहे. 

Post a Comment

0 Comments