भादा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
बी डी उबाळे
औसा: सर्वप्रथम रायगडावर महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांची समाधी स्थळ शोधून काढून जयंती साजरी करणारे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू क्रांतीसुर्य, सत्यशोधक, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी आज मंगळवार दि 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता भादा ता. औसा या गावामध्ये प्रथमच मुख्य चौकामध्ये सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालय भादा येथेही महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भादा येथील जागृत नवतरुण मित्र मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. जयंतीदिनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतीमेस यावेळी सर्व तरुण मंडळींनी मनोभावे विनम्र अभिवादन केले. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर सामाजिक कार्यकर्ते दिपक शिवलकर, ग्राम पंचायत सदस्य योगेश लटूरे यांनी प्रकाश टाकला. यावेळी रामेश्वर माळी, ऋषी चिंचोलकर, ॲड मोहन शिवलकर, तुकाराम चिंचोलकर, सोसायटी संचालक प्रल्हाद लटूरे, आदीसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments