महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नवी मुंबई बेलापूर कोर्ट बार असोसिएशनमध्ये साजरी
मुंबई: नवी मुंबई बेलापूर कोर्ट बार असोसिएशन मध्ये 132 वी जयंती दि 14 एप्रिल 2023 रोजी विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव, प पू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.सुनील मोकल, प्रमुख उपस्तिथि अँड अक्षय काशीद, अँड संदिप रामकर, यांची होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे असून यापुढे जयंती व संविधान कार्यशाळा आयोजित करुन संविधान जनजागृती कार्यक्रम करु असे मार्गदर्शन येथे प्रमुख वक्त्यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन विधीपदवीधर मनोज भिमसेन राजपक्षे म्हणाले की भारताचे संविधान देश चालविण्याची एक आदर्श आचार संहिता असुन संविधान मुल्ये जन माणसात रुजवणे व भारतीय नागरिकांचे शोषण होणार नाही ही सर्व प्रशासनातील व्यक्तीची मुख्य जबाबदारी आहे. विश्व शांती प्रिय बुद्ध यांनी मानवी कल्याणाकरीता पंचशील व समता, स्वतंत्र, बंन्धुता, न्याय हे विचार समस्त भारतीय समाजाला दिले. ते तत्व संविधान निर्माते भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समाविष्ट करून समानता प्रस्थापित केली असे ते मनाले.
यावेळी भारतीय संविधान प्रस्ताविक वाचन अँड. पल्लवी मनोज राजपक्षे व अँड. प्राजक्ता देशमुख यांनी केले. यावेळी अँड, अशोक साबळे ,जयदीप डमाळे, तेजस रनपिसे, मयुर गोटाळे, जयेश घरत, डी.आर. अँड. हणवते, पाडूंरग सोनावणे, नामदेव हणवते,अँड वाघमारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. अक्षय मोरे व ज्ञानदिप निकाळजे यांनी केले आभार अँड.तुषार सोनकांबळे यांनी मानले.


0 Comments