Latest News

6/recent/ticker-posts

शिवसेना शिंदे गटाच्या चाकूर तालुका उपप्रमुख पदी बळवंत तुकाराम सगर यांची निवड

शिवसेना शिंदे गटाच्या चाकूर तालुका उपप्रमुख पदी बळवंत तुकाराम सगर यांची निवड


चाकूर
: शिवसेना शिंदे गटाच्या चाकूर तालुका उपप्रमुख पदी वडवळ(ना.) येथील बळवंत तुकाराम सगर यांची निवड शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर ग्रामीण चे गोपाळभाऊ माने यांनी शिवसेना पक्षाच्या उपतालुका प्रमुख पदी (कार्यक्षेत्र - वडवळ (ना.) जि. प. गट) नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीची असेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेवुन कार्य कराल असा विश्वासासह शुभेच्छा देण्यात आले आहेत या निवडीबद्दल बळवंत सगर यांचे दयानंद पारीक, संतोश आचवले, राजकुमार पेस्टे, कोमेश कसबे, विजयकुमार पेस्टे, बाबू वाडकर, साईनाथ मिरकले, बालाजी साबदे, संजय कुंभारे, बाबू चंदे सह मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments