ना संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड जीवन व कार्य पुस्तिकेचे विमोचन
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष काही महिन्यापूर्वी साजरा करण्यात आला आहे. राज्याचे क्रिडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुंबई येथील मंत्रालयीन दालनात सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड जीवन व कार्य संकलित पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड व्यकटराव बेंद्रे, अँड प्रदिपसिंह गंगणे, अँड आकाश घोलप, अँड सुहास बेंद्रे, पप्पु गायकवाड, विठ्ठल चव्हाण सभापती कृषी उत्तपन्न बाजार समिती उदगीर आदींची उपस्थिती होती.
सत्यशोधक बहुजन चळवळीत मोलाचे योगदान व ज्यांनी आयुष्य भर सत्यशोधकी विचार आयुष्यभर जोपासला व सरते शेवटी सर्व चल, अचल मालमत्ता सत्यशोधक समाजास अर्पण केली. अशा या महामानवाचे जीवन कार्य पुस्तिकेच्या रूपाने प्रकाश झोतात आणल्याबद्दल, खाटीक समाजास ही पुस्तिका दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करत अँड प्रदिपसिंह गंगणे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. या पुस्तिकेची प्रस्तावना माजी राज्यसभा सदस्य तथा माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे सर यांनी लिहिली आहे तर मुखपृष्ठ शिवाजीराव हांडे, दत्तात्रय जोशी यांनी तर प्रकाशन महारुद्र मंगनाळे, मुक्तरंग प्रकाशन लातूर यांनी केले आहे
0 Comments