जीवन विकास प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा उत्साहात
लातूर : एमआयडीसी येथील मतिमंद विद्यालयाच्या सभागृहात जीवन विकास प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात नुकतीच पार पडली.
माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. प्रारंभी सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम पत्रिकेनुसार दहा विषयांचे वाचन प्रभारी सचिव अभय शहा यांनी यावेळी केले. या सर्वसाधारण सभेस बहुसंख्य संचालक मंडळाची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचलन सदस्य पी व्ही कुलकर्णी यांनी केले तर आभार सदस्य डॉ. चेतन सारडा यांनी मानले.
0 Comments