Latest News

6/recent/ticker-posts

चवणहिप्परगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात

चवणहिप्परगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात


देवणी
: (प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) बौद्ध समाज मंदिर चवण हिप्पगा येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमीत्य सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन गावचे प्रथम नागरीक सौ .शकंतुलाबाई मोरे व चेअरमन राम बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण डॉ. अमोल विदयासागर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉ. अमोल विदयासागर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल असे मार्गदर्शन केले व सायंकाळी ५:०० वाजता जयंती मोहोत्स समितीच्या वतीने भव्य मिरवणुकिचे उद्घाटन प्रमेश्वर कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जवान नितीन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. जयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंगे उपाध्यक्ष, तातेराव कांबळे, सचिव श्रीधर कांबळे यांच्या सह जयंती समितीचे सर्व पदाधिकारी,आंबेडकर प्रेमी व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पो. कॉ. बिट जमादार देविदास किवंडे  यांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .आभार मुकेश कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments