रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूल, शिराळा येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्साहात
शिराळा :(प्रतिनिधी/बालाजी राजमाने) रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूल, शिराळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक सचिन माने, मुख्याध्यापिका सौ. शितल माने तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे दिली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षकांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
0 Comments