Latest News

6/recent/ticker-posts

तोगरी शिवारात ६१ किलो गांजासह दोन जण ताब्यात – देवणी पोलिसांची मोठी कारवाई

तोगरी शिवारात ६१ किलो गांजासह दोन जण ताब्यात – देवणी पोलिसांची मोठी कारवाई


देवणी : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेत देवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तोगरी शिवारातील एका शेतातून ६ लाख १० हजार रुपये किमतीचा ६१ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी गांजाची २८ झाडे जप्त करण्यात आली, ज्याचे एकूण वजन ६१ किलो असून बाजारभावानुसार त्याची किंमत अंदाजे ६ लाख १० हजार रुपये आहे.

या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खालील दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये गंगाराम हाकू चव्हाण, संतोष गंगाराम चव्हाण दोघेही रा. तोगरी, ता. उदगीर, जि. लातूर. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि डोके, पीएसआय गोंड, वऱ्हाडे, डफडवाड, तसेच पोलीस अंमलदार कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments