Latest News

6/recent/ticker-posts

तांत्रिक प्रवेश योजनेद्वारे भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी

तांत्रिक प्रवेश योजनेद्वारे भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी


लातूर :(जिमाका) दि. 20 भारतीय सैन्यात अधिकारी पदावर सामील होण्याची इच्छा असलेल्या लातूरमधील 10+2 विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक प्रवेश योजना (टीईएस) अंतर्गत 54 वी अधिसूचना 13 मे 2025 पासून सुरू होत आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खुली आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः माजी सैनिकांच्या पाल्यांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून 2025, दुपारी 12 वाजता संपेल. ही संधी साधण्यासाठी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments