Latest News

6/recent/ticker-posts

माधवबाग सेंद्रिय आंबा बागेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची भेट

माधवबाग सेंद्रिय आंबा बागेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची भेट

निलंगा : लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी निलंगा तालुक्यातील माधव चांभारगे यांच्या "माधवबाग" सेंद्रिय केशर आंबा बागेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बागेतील विविध आंबा जातींची माहिती घेतली तसेच सेंद्रिय पद्धतीने केल्या जाणाऱ्या आंबा लागवडीचा बारकाईने अभ्यास केला. सदर बागेत जीवामृत, घन जीवामृत, वेस्ट डी-कंपोजर, गांडूळखत, शेणखत, दशपर्णी अर्क अशा विविध सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जातो. याविषयीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी मॅडम यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.

या दौऱ्यादरम्यान मॅडम यांच्या हस्ते ‘दशेरी’ या जातीच्या आंबा रोपाची प्रतीकात्मक लागवडही करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांनी माधवबागेतील केशर, दशहरी व इतर रसाळ आंब्यांचा स्वाद घेतला व बागेतील सेंद्रिय पद्धतीचे कौतुक केले. यावेळी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका कृषी अधिकारी शिंदे व कृषी पर्यवेक्षक घारोळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी यजमान माधव चांभारगे यांच्यासह विठ्ठल चांभारगे व परिसरातील इतर शेतकरीही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments