माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : शालेय आठवणींना दिला उजाळा
निटुर : (प्रतिनिधी/युसूफ शेख) महाराष्ट्र विद्यालय, निटुर येथील सन 2013-14 मधील माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत विद्यार्थीदशेचा पुन्हा एकदा आनंद घेतला. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले. अनेकांनी आपल्या अनुभवांतून शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपण जीवनात कसे घडत गेलो, यावर भावनिक संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ज्यांचे घर कच्चे असते त्यांचे भवितव्य पक्क करण्याचे साधन म्हणजे शाळा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी दत्ता सूर्यवंशी यांनी केले. यावेळी इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक – विमल नरसिंग मगर, द्वितीय – अनुष्का विजयकुमार देशमुख, तृतीय – अमृता दत्ता जगदाळे यांच्यासह अंकिता सूर्यवंशी, स्नेहा हांडे या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वि.का.से.स. सोसायटीचे चेअरमन दिनकर नाना निटुरे, पत्रकार के. वाय. पटवेकर, निटूर पोलीस चौकीचे अमलदार गौतम घाडगे, पत्रकार राजकुमार सोनी, युसुफ शेख, पालक नरसिंग मगर, किरण मगर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, पाटील, नाईकवाडे, सूर्यवंशी, अनिल देशमुख, राजू सोमवंशी, हजारे यांचा समावेश होता. माजी विद्यार्थ्यांमध्ये विशाल साळुंके, किशोर भोयबार, शुभम सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी, प्रवीण कांबळे, वाहिद सरदार, कलीम पठाण, आकाश तेलंगे, सबिया पठाण, प्राजक्ता भोयबार, नागीण, तेजा सूर्यवंशी, रविना, मोहिनी भोयबार, रब्बना पठाण आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी दत्ता सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक नरसिंग पाटील यांनी केले.
0 Comments