युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औराद – दहावी परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
औराद शाहजानी : सीमा एकात्मता शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औराद येथील विद्यार्थ्यांनी यंदाही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी बसले होते. यापैकी सर्व ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ४४ विद्यार्थी ‘विशेष प्राविण्य’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम : गोपने अनुराग नर्सिंग – ९८.६०%, द्वितीय : भंडारे आशिष अविनाश व धनासुरे नयन संतोष – ९८.००%, तृतीय : कोडे युवराज नागप्पा – ९७.६०% यशस्वी विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. विज्ञान विषयात १० विद्यार्थ्यांनी, गणित विषयात ११ विद्यार्थ्यांनी, सामाजिक शास्त्रात ९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून शाळेची शान वाढवली आहे. संस्थेच्या अध्यक्षा - राजकन्या दरक, सचिव- जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, तसेच पंकज कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, उल्हास सूर्यवंशी, कांभोज अनिता, सय्यद मियासाब, आनंद चांडेश्वरी, राजेश माळी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
0 Comments