महाराष्ट्र विद्यालय, निटुरची उज्वल यशाची परंपरा कायम
निलंगा : महाराष्ट्र विद्यालय, निटुर या विद्यालयाने 2025 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत 100 टक्के निकाल प्राप्त केला आहे. परीक्षेला बसलेले एकूण 80 विद्यार्थी सर्वजण उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेचा एकूण निकाल 100 टक्के विशेष प्राविण्य प्राप्त (75 टक्के ते 97 टक्के) विद्यार्थी 41 प्रथम श्रेणी (60 टक्के ते 75 टक्के) 29 विद्यार्थी द्वितीय श्रेणी (50 टक्के ते 60 टक्के) : 10 विद्यार्थी
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यशाचा गौरव प्रथम क्रमांक : विमल नरसिंग मगर – 97 टक्क, द्वितीय क्रमांक : देशमुख अनुष्का विजयकुमार – 94.60 टक्के, तृतीय क्रमांक : जगदाळे अमृता दत्ता – 92 टक्के, हांडे स्नेहा पिराजी – 90.20 टक्के, सुर्यवंशी अंकिता सुग्रीव – 90.20 टक्के, बाबर ओमकार भागवत – 88.60 टक्के, सावळे राजलक्ष्मी विलास – 88.20 टक्के, मगर रक्षा सुधीर – 88 टक्के, सरकाळे रेवाप्पा डिगांबर – 85 टक्के, सगर संगीता भाऊसाहेब – 85 टक्के, गस्ते जास्मीन आलीम – 84.80 टक्के
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर (अंकल), अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ, तसेच सहशिक्षक सूर्यवंशी नरसिंग, भोईबार हनुमंत, नाईकवाडे माणिक, सूर्यवंशी रवींद्, विशाल जाधव, निटुरे राजेंद्र, देशमुख अनिल आणि पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments