Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के


अहमदपूर : तालुक्यातील तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा ( CBSE ) इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

शाळेतून सात्विक बालाजी कासले याने 96 टक्के गुण घेऊन प्रथम तर अन्वेषा बालाजी सोमावार हिने 91 टक्के गुण घेऊन व्दितीय आणि प्रणाली प्रशांत वाघमोडे हिने 90 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.  विद्यालयातून एकूण 26 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 विद्यार्थी विशेष प्रविण्यामध्ये व 07 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 05 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल दी. एन. टी. सी. सी. सोसायटी व जे . एम. ई. सोसायटीचे अध्यक्ष श्री जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू जीवनकुमार मद्देवाड-माले, प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचेही अभिनंदन केले. 'विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हे उज्ज्वल यश संपादन झाले आहे' असे मत संस्थाध्यक्षांनी व्यक्त केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments