Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू विद्यालय, निटूर : एसएससी परीक्षेत 97.77 टक्के निकाल

छत्रपती शाहू विद्यालय, निटूर : एसएससी परीक्षेत 97.77 टक्के निकाल


निटूर : (ता. निलंगा) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (एसएससी) बोर्ड परीक्षेत छत्रपती शाहू विद्यालय, निटूर यांनी यशाची परंपरा कायम राखत 97.77 टक्के निकालाची नोंद केली आहे. या परीक्षेला विद्यालयातील एकूण 45 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 19 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 7 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 18 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.

करंजे रुद्रेश संगमेश्वर- 97.20 टक्के (शाळेत व केंद्रात प्रथम), करंजे सार्थक दत्ता- 93.00 टक्के, इंगळवाड स्नेहा विष्णुदास- 89.40 टक्के करंजे रुद्रेश याने संबंधित परीक्षा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ही विद्यालयासाठी विशेष गौरवाची बाब ठरली आहे. विद्यालयाचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, अध्यक्ष दीपाली अविनाशराव जाधव, मुख्याध्यापक अनिल सोमवंशी, संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments