Latest News

6/recent/ticker-posts

लोकमान्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

लोकमान्य विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


पानचिंचोली : दि. 11 मे 2025 लोकमान्य विद्यालय, पानचिंचोली येथील 1997-98 च्या बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र जमून स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला. या सोहळ्याला विद्यालयाचे शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून करण्यात आली. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांचा यथोचित सन्मान व गौरव केला. यावेळी जाधव, पाटील, देवगुरे, स्वामी, गायकवाड, पठाण, केंद्रे, माने, कुलकर्णी आणि काळगे मॅडम उपस्थित होते. शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शनही केले.

स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय आठवणी शेअर करत गप्पा रंगवल्या. शाळेतील दिवस, मित्र, मजा, मस्ती आणि शिक्षणाचे क्षण पुन्हा उजळून निघाले. खेळीमेळीत वातावरणात हास्यविनोद, गप्पा, जुन्या आठवणींनी रंग भरला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अश्विनी चौधरी यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी हर्षवर्धन सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी केवळ जुन्या आठवणींचा नव्हे, तर नवे बंध मजबूत करणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Post a Comment

0 Comments