Latest News

6/recent/ticker-posts

नवी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय विद्यालयात बुद्ध पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

नवी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय विद्यालयात बुद्ध पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

नवी मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय विद्यालय, सेक्टर १, सीबीडी बेलापूर येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात आणि अभिवादनपूर्वक साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अंबेडकर युवा महिला समिती, आंबेडकरी युवा समिती आणि पाटलीपुत्र बुद्ध विहार संवर्धन समिती, सीबीडी बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक बुद्ध वंदनाने करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, ज्याचे वाचन कु. तृणाली राजपक्षे यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून अॅड. पल्लवी राजपक्षे, आयआरएस धनंजय दहिवले आणि मनोज राजपक्षे यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र कोळपे, पत्रकार के. वाय. पटवेकर यांची उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यक्रमात राजेश येलवे, स्वप्निल गायकवाड आणि सुगंधा लोकरे यांनी भीम-बुद्ध गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल दंदाडे होत्या. सूत्रसंचालन प्रियंका भोसले यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले. या कार्यक्रमाला एम. के. भालेराव, अमित बनसोडे, शशिकांत साळवे, अजय कांबळे, सचिन करंदीकर, अतिश भोसले, हेमलता रंगारी, निशा जाधव आणि निशा साळवे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments