Latest News

6/recent/ticker-posts

बौद्ध गार्डन येथे भारतीय बौद्ध महासभेच्या दहा दिवसीय शिबिराचा प्रारंभ

बौद्ध गार्डन येथे भारतीय बौद्ध महासभेच्या दहा दिवसीय शिबिराचा प्रारंभ

भंतेजी महाविरो थेरो यांच्या हस्ते श्रामनेर प्रवज्जा विधी व उद्घाटन संपन्न

लातूर : दि 9 मे शहरातील बौद्ध गार्डन येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे काल दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 9 वाजता प्रवज्जा विधी व उद्घाटन समारंभ भंतेजी महाविरो थेरो काळे बोरगाव यांच्या हस्ते पार पडला तर या शिबिराचा समारोप भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या शिबिरास एकूण शंभर नुतन भन्तेजी यांनी सहभाग नोंदवला आहे. दहा दिवसीय चालणाऱ्या या श्रामणेर शिबिरामध्ये बौद्धांची शिकवण दिली जाणार असून एक आदर्श समाज घडवण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्षा आशाताई चिकटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी व माता- पुरुष पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments