Latest News

6/recent/ticker-posts

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : आठवणींना उजाळा, शाळेला CCTV भेट

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : आठवणींना उजाळा, शाळेला CCTV भेट


निटुर : (प्रतिनिधी/युसूफ शेख) महाराष्ट्र विद्यालय निटुर येथील सन २००३-०४ मधील पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी २१ वर्षांनंतर एकत्र आले आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, विद्यार्थीदशा पुन्हा अनुभवण्याचा आनंद लुटला. 'पुन्हा जागवू आठवणी' या संकल्पनेतून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संपूर्ण संच भेट दिला. ही भेट एक आठवण म्हणून शाळेस सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विनोद निटुरे यांनी केले. यानंतर विविध आठवणींचा कोलाज उलगडत गेला. बालपणीचे किस्से, शिक्षकांच्या आठवणी, गमती-जमती यांची उजळणी करत वातावरण भारावून गेले.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी युसुफ शेख, सुधीर निटुरे, नितीन पाटील, प्रवीण पाटील, वैशाली चिरके, जयश्री भदरगे, मनोज मोगरगे, धनाजी उकळे, विणा चौधरी, रंजना शिंदे, जना सोलंकर, शितल खोत, रंजना निरगुडे, अर्चना कवडे, संगीता सूर्यवंशी, उषा मोगरगे, मुक्ता पाटील आदींनी परिश्रम घेतले.

पुन्हा एक दिवस विद्यार्थीदशेचा...


२१ वर्षांनंतर पुन्हा बालपण आणि शालेय जीवनातील एक दिवस अनुभवण्याची संधी मिळाली. पुन्हा विद्यार्थी होणे शक्य नाही, हे माहीत असूनही त्या दिवसात शाळेच्या गेट-टुगेदरच्या रूपाने विद्यार्थी जीवन जगता आले, याचं समाधान चेहऱ्यावर झळकत होतं. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी युसुफ शेख यांनी केले.

Post a Comment

0 Comments