Latest News

6/recent/ticker-posts

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात तायक्वांदो संघटनेमार्फत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला सुरुवात.

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात तायक्वांदो संघटनेमार्फत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला सुरुवात


लातूर : दिनांक 15 मे चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला आज सुरुवात झाली असून तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर या संघटनेमार्फत महाविद्यालयातील तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत.

चन्नबसवेश्वर महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयीन तरुणी समाजासोबत वावरताना मजबूत व्हावी या संकल्पनेतून स्वसंरक्षण प्रशिक्षण या सहा दिवसीय उपक्रमाची आज दिनांक 15 मे रोजी शहरातील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत हा उपक्रम राबविला जात आहे तर या उपक्रमात तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर संघटनेचे सचिव तथा आशियाई तायक्वांदो महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय खेळाडू मास्टर धनश्री मदने व मास्टर जानवी मदने या प्रशिक्षण देत आहेत. या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून असे उपक्रम विविध शाळा महाविद्यालयाने राबवावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी यांनी व्यक्त केले आहे. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments