Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयासाठीचा मार्ग मोकळा; आरोग्य विभागाच्या ताब्यात कृषी महाविद्यालयाची १० एकर जमीन

जिल्हा रुग्णालयासाठीचा मार्ग मोकळा; आरोग्य विभागाच्या ताब्यात कृषी महाविद्यालयाची १० एकर जमीन

लातूर : अनेक वर्षांपासून रखडलेला जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचा विषय अखेर मार्गी लागला आहे. कृषी महाविद्यालयाच्या १० एकर जमिनीचा ताबा आज महसूल विभागाकडून आरोग्य विभागाकडे औपचारिकपणे हस्तांतरित करण्यात आला.

गेल्या १४ मे २०२५ रोजी जमिनीच्या मोबदल्यात आरोग्य विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या खात्यावर ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी राज्य शासनाने मंजूर केला होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला.

आज, २२ मे २०२५ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी महाराणाप्रतापनगर येथील सर्वे क्र. ३७/१ मधील १० एकर जमिनीचा ताबा महसूल विभागाकडून घेतला. या वेळी मंडळ अधिकारी सुनील लाडके, तलाठी गोपाळ धुमाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, डॉ. किरण गरड, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर मोरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्यंकट जगताप उपस्थित होते.


या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, अशी मागणी 'माझं लातूर' परिवाराने केली आहे. 'माझं लातूर'
परिवार यांनी जिल्हा रुग्णालयासाठी सातत्याने शासन व प्रशासन पातळीवर पाठपुरावा करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Post a Comment

0 Comments