गुरूंचे स्मरण म्हणजेच कृतज्ञतेचा उत्सव – प्राजक्ता मोहिते
माळशिरस : गुरूंचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरूपौर्णिमा होय, असे प्रतिपादन वेळापूर मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी प्राजक्ता मोहिते यांनी गुरूपौर्णिमा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी होते. प्राजक्ता मोहिते आपल्या भाषणात म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये गुरू हेच खरे प्रेरक, मार्गदर्शक आणि मित्र असतात. तेच आपल्याला ज्ञान, शिस्त आणि चांगले संस्कार देतात. शिक्षणाबरोबरच ते आपल्याला जबाबदार नागरिक घडवतात. गुरू आपल्या शिष्याचे भविष्य घडवतात.
कार्यक्रमात शाळेतील शिक्षक महादेव घोगरे, नितीन चव्हाण, सौ. प्र. रा. इंगोले, श्रीम. आ. शां. जैन, कृष्णकांत तुपे, श्रीम. किरण घाडगे, सौ. क. सं. घाडगे आदींचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सखुबाई साठे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments