Latest News

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त किरण कुलकर्णी यांचा सन्मान

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त किरण कुलकर्णी यांचा सन्मान

लातूर : { प्रतिनिधी/एन जे बिराजदार} दि. १७ सप्टेंबर २०२५ - जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त “मराठवाडा मुक्तिलढा” ही सचित्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेचे मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट आकर्षक पद्धतीने सिद्ध केल्याबद्दल किरण शांताबाई वसंतराव कुलकर्णी (के.के. ग्राफिक्स) यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी माननीय पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते किरण कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला गेला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त डॉ. मानसी मीना, पोलीस अधीक्षक तांबे साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्तिलढ्याचा देदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रकाशित होत असलेली ही पुस्तिका सर्वांगसुंदर व सचित्र स्वरूपात साकारण्यात किरण कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments