जिल्हास्तरीय तायक्वांन्दो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व तायक्वांन्दो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर महानगरपालिका व लातूर ग्रामीण जिल्हास्तरीय मुले व मुली तायक्वांदो स्पर्धा दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या तर या स्पर्धेचा निकाल दिनांक 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांन्दो क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला असून जवळपास दोनशेहून अधिक लातूर महानगरपालिका व लातूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता तर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी कसगावडे यांच्या हस्ते पार पडले. सदर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना विभाग स्तरावरील संपन्न होणाऱ्या स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार असून या स्पर्धा दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी बॅडमिंटन हॉल जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे पार पडणार आहेत तर राज्यस्तरीय तायक्वांन्दो स्पर्धा दिनांक 13 ते 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणांबरोबरच खेळाचा सराव करून खेळातील फायदे प्राप्त करून घ्यावे तसेच सदृढ आरोग्यासाठी किमान एक तास व्यायाम करावा असा मौलिक सल्ला जिल्हा क्रीडा अधिकारी कसगावडे यांनी दिला तर विजेत्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे व तायक्वांन्दो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते तर स्पर्धेचे कामकाज आशियाई तायक्वांन्दो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायक्वांदो पंच नेताजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंच धनश्री मदने, जान्हवी मदने, श्रद्धा कुलकर्णी, अनुश्री कुलकर्णी, गीता नागरगोजे यांनी पाहिले आहे तर स्पर्धा यशस्वीतेसाठी स्वप्निल मुळे व प्रशांत यांनी यशस्वी प्रयत्न केले.



0 Comments