इंटरनॅशनल फुंनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे यशस्वी कलर बेल्ट परीक्षा
लातूर : आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी ख्वाजा नगर, खाडगाव रोड येथे इंटरनॅशनल फुंनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन (IFSKA) तर्फे कलर बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परीक्षेत कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन केले.
अविर कालदाते, साद शेख, अनुजू जाधव, वैष्णवी बुद्रूपे, अंशुमून शिरासकर, आर्यन वाघमारे, फैज शेख, समर्थ कस्तुरे, आस्था गडाले, विराज कोल्हाळे, तेजू हजारे, गीता शिंदे, शाबाज सय्यद, वैष्णवी जाधव, रुद्रादा सोमवंशी, मुगदा पाटील, हर्ष अकाडे, हमजा शेख, हर्षदा दुरुगकर, स्वराली दुरुगकर, संचित थोरात, कार्तिकी पांचाल, अस्मित गायकवाड, वेदांत कांबळे, अशितोष कांबळे, अविष्कार केले, अवधुत केले, प्रथमेश वाघमारे, साक्षी मगर या कराटेपटूंनी विविध कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवीकुमार शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राचे मालक व संपादक के. वाय. पटवेकर आणि युथ पॅंथरचे प्रशांत वाघमारे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजमीर शेख यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांना IFSKA कराटे इंडियाचे अधिकृत प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले. परीक्षेचे मुख्य परीक्षक म्हणून अजमीर शेख यांनी तर सहपरीक्षक म्हणून रेहान शेख आणि विशद कांबळे यांनी काम पाहिले.
प्रमुख पाहुणे के. वाय. पटवेकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यांनी क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा थोडक्यात आढावा घेऊन कराटेसारख्या खेळांद्वारे शिस्त, मानसिक व शारीरिक विकास साधता येतो यावर भर दिला. तसेच विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेत आपल्या भविष्यासाठी सकारात्मक वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.




0 Comments