Latest News

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

धाराशिवच्या खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

लातूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन २४ व २५ सप्टेंबर २०२५ रोजी बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत धाराशिव येथील तायक्वांदो खेळाडूंनी चमकदार कामगिरी सादर करून राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी (संभाजीनगर) आपली निवड निश्चित केली आहे.

१४, १७ व १९ वयोगटातील निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रोहित गोरे, समर्थ कदम, अर्णव ढेकणे, प्रणित बनसोडे, अंश गायकवाड, अनुराग पाटील, संघर्ष कांबळे, अथर्व गरड, राधेश ढेकणे, विनीतकुमार रंगदळ, ऋत्विक ठाकर, हर्षवर्धन शिंदे, किरण हिंगमिरे, मल्लिकार्जुन कोणे आणि ऋतुराज मोरे यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जि. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, सहसचिव सूर्यकांत वाघमारे तसेच अनिल बळवंत व रवि जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना राजेश महाजन, राम दराडे व माधव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments