Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निटूरच्या खेळाडूंची चमक

जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निटूरच्या खेळाडूंची चमक


लातूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी बॉक्सिंग हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले. 

या स्पर्धेत निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या खेळाडूंनी उज्वल कामगिरी करत विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. माळी संध्या गणपती (वय 14 वर्षे गट, 34 किलो वजन गट) – प्रथम क्रमांक , देशमुख पार्थ संजयकुमार (वय 14 वर्षे गट, 32 किलो वजन गट) – द्वितीय क्रमांकया यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, मार्गदर्शक के. वाय. पटवेकर, तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments