Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वैष्णवी गुत्तेदारची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वैष्णवी गुत्तेदारची विभागीय स्पर्धेसाठी निवड


लातूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले.

या स्पर्धेत क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव (ता. अहमदपूर) येथील विद्यार्थिनी वैष्णवी हनमय्या गुत्तेदार हिने कराटे क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी सादर केली. तिने 17 वर्ष वयोगट, 52 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी नांदेड येथे आपली मजल मारली आहे.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, शाळेच्या सीईओ श्रीमती रितू मद्देवा-माले, प्राचार्या जेबाबेरला नादार तसेच शाळेचे समन्वयक संगमेश्वर ढगे, इस्माईल शेख आणि राहुल अडसूळ यांनी विजेत्या खेळाडूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. वैष्णवीला प्रशिक्षक विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक प्रशिक्षणामुळेच खेळाडूंनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट छाप उमटवली असल्याचे शालेय व्यवस्थापनाने नमूद केले. आगामी विभागीय स्पर्धेतही वैष्णवी गुत्तेदार हिने असेच यश संपादन करून शाळेचा लौकिक वृद्धिंगत करावा, अशा शुभेच्छा संस्थेकडून देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments