Latest News

6/recent/ticker-posts

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त लातूरमध्ये भव्य मोटरसायकल रॅली

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त लातूरमध्ये भव्य मोटरसायकल रॅली


लातूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने लातूर शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाचा भाग म्हणून आज, रविवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3:00 वाजता सोफिया मशीद येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

ही रॅली सोफिया मशीद येथून सुरू होऊन गंजगोलाई, मुख्य बसस्थानक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाण्याची टाकी, पाच नंबर चौक अशा मुख्य मार्गांवरून परत सोफिया मशीद येथे येऊन समारोप करण्यात आली. रॅलीदरम्यान धार्मिक नारे, बॅनर आणि आकर्षक सजावटीमुळे शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या मोटरसायकल रॅलीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. तरुणांसह जेष्ठ नागरिकही यात सहभागी झाले होते. संपूर्ण रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाने योग्य बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे रॅली शिस्तबद्ध आणि शांततेपूर्ण वातावरणात पार पडली. शहरभर या रॅलीमुळे बंधुतेचा, ऐक्याचा आणि आनंदाचा संदेश दिला गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रॅलीदरम्यान पाहणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात सहभागींचे स्वागत केले.



Post a Comment

0 Comments