अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जालना जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
लातूर : दि. ८ सप्टेंबर – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जालना जिल्ह्याच्या जिल्हाप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर झाली असून जालना जिल्ह्यात काँग्रेस संघटनेस नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सुरेंद्र धुमाळ, लाला पटेल, हाल्लाप्पा कोकणे, भीमराव पाटील, नागनाथ पाटील, माधवराव पोळ, पंडित भदर्गे, राम गायकवाड, सुधीर लखन गावे, अनिल अग्रवाल, अशोक शेटकार, लक्ष्मण बोधले, सुदर्शन जागले, मारुती सावकार, दिलीप हुलसुरे, बाबासाहेब पाटील, विश्वास जाधव, दिनकर नीटुरे, देविदास पतंगे, सुभाष पाटील, प्रताप कोयले, पुंडलिक बिराजदार, रमेश मोगरगे, नरसिंग ढाकणे, प्रशांत येळकर, व्यंकटराव शिंदे, लिंबराज जाधव, दिनकर पाटील, गुंडेराव बिराजदार, बंडा आप्पा ढेकरे, गोविंद सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गडिमे, बालाजी भुरे, साहेबराव भोईबार, हरिदास बोळे, मंगेश चव्हाण, संभाजी जाधव व दीपक चोपणे आदींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेस नवे ऊर्जानिर्माण होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


0 Comments