ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल वलांडीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
वलांडी : दि. 09 व 10 सप्टेंबर 2025 रोजी व्यंकटेश विद्यालय, वलांडी येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ब्ल्यूबेल पोदार लर्न स्कूल, वलांडीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी दयानंद खिंडे हिने थाळीफेक स्पर्धेत तालुका प्रथम क्रमांक पटकावला, तर गोळाफेकमध्ये ती द्वितीय आली. उंचउडी प्रकारात दिव्या श्रीकांत पताळे ही प्रथम, तर मेहरिन तांबोळी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय, ८० मीटर अडथळा धावण्याच्या स्पर्धेत अल्फिन जावेद सय्यद हिने प्रथम तर श्रावणी खिंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात उंचउडी प्रकारात प्रज्वल किशन भोसले (देवणी) याने प्रथम तर सोहम नाहीमे याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ८० मीटर अडथळा धावण्यात दर्शक दगडू टोंपे हा तालुका द्वितीय ठरला. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामागे शाळेचे क्रीडाशिक्षक विक्रम भगवान गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थाअध्यक्ष अमित पोस्ते, शंकर पोस्ते, संगमेश्वर पोस्ते, मल्लिकार्जुन हुडे, लक्ष्मीकांत पोस्ते, अरुण पोस्ते, अमोल आंबेगावे, अविनाश झेरिकुंटे तसेच प्राचार्य विनोज पी. बी, उपप्राचार्या सौ. प्रगती संगोळगे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



0 Comments