Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने अ. हामिद देशमुख यांचा गौरव

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने अ. हामिद देशमुख यांचा गौरव


लोहा : लोहा येथील ए. आर. जागीरदार उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अ. हामिद खाजा मैनोद्दीन देशमुख यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


हा गौरव सोहळा १४ सप्टेंबर रोजी लातूर येथील कॉकसिट कॉलेज, अंबाजोगाई रोड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. ए. गफ्फार होते. आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते देशमुख सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमास खासदार डॉ. शिवाजी काळगे, मुजीब पटेल जागीरदार, जब्बार सागरे, मोईज शेख, मोहिब कादरी, मजीद जागीरदार, हाश्मी बुऱ्हाण, नुसरत कादरी, फजल काझी, शेख नदीम, शेख अनिस, वहाब जागीरदार, फारुख जागीरदार, कादीर जागीरदार व अब्बास शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. हामिद देशमुख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विविध स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments