लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर लवकरच 46 पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया
लातूर : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया 2024-25 आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई 30 जागा आणि चालक पोलीस शिपाई 16 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती लातूर जिल्हा पोलीस दलाच्या policerecruitment2025.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आली आहे.
उमेदवारांना पोलीस अधीक्षक लातूर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी ऑनलाइन आवेदन सादर करण्याची सुविधा policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


0 Comments