निलंगा विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने सुसंवाद व आढावा बैठकीचे आयोजन
निलंगा : निलंगा विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईच्छुक उमेदवार, बुथ प्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, जालना जिल्हा काँग्रेस पक्ष प्रभारी अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी भूषविले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव सुरेश हावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी लोकनेते स्वर्गीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिरूर अनंतपाळ, निलंगा, देवणी तालुक्यांतील 2025 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेनिमित्त काँग्रेस पक्षाच्या निवडणूक रणनीती, संघटन, सुसंवाद आणि आढावा विषयावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बुथ प्रमुख यांनी विधानसभा निरीक्षकांसमोर आपली मते सविस्तरपणे मांडली. या सुसंवाद व आढावा बैठकीला काँग्रेस कमिटीचे आजी-माजी पदाधिकारी, विविध फ्रंटल काँग्रेस सेलचे तालुका पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक, तसेच कार्यकर्ते आणि बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनात जिल्हा दूध महासंघाचे चेअरमन राजेंद्र सुर्यवंशी, माजी जि.प. उपाध्यक्ष भगवानराव पाटील विजयनगरकर, व्यंकटराव शिंदे, अनिल अग्रवाल, नगरसेवक सुधीर लखनगावे, माजी पं.स. सभापती हल्लापा कोकणे, माजी जि.प. समाजकल्याण सभापती राम गायकवाड, सुरेंद्र धुमाळ, माजी नगराध्यक्ष महमंदखाँ पठाण, माजी नगरसेवक अशोकआप्पा शेटकार, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष लाला पटेल, अर्जुन जाधव, देविदास पंतगे, भरत बियाणी, सोनाजीराव कदम, सरपंच रमेश मोगरगे, चेअरमन दिनकर निटुरे, रवी पंडितराव भदरगे यांनी सहकार्य केले.



0 Comments