नसीमा खडके यांचे अल्पशा आजाराने निधन
निलंगा : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत म. अब्दुल गनी खडके यांच्या पत्नी व ‘प्रेरणा श्रमिक विकास मंडळ, निलंगा’ या संस्थेच्या सचिव नसीमा अब्दुल गनी खडके (वय ६०) यांचे सोमवारी रात्री ९:०० वाजता शिवाजी नगर, निलंगा येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही रजिऊन त्यांच्यावर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता दादापीर दर्गा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

0 Comments