लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे, देवणी यांच्या वतीने ‘एकता दौड’ रॅली उत्साहात
देवणी : (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दि. ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देवणी पोलीस स्टेशनतर्फे ‘एकता दौड’ रॅलीचे आयोजन आज सकाळी करण्यात आले. ही रॅली मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. रॅलीची सुरुवात सकाळी ठिक ८ वाजता विवेक वर्धिनी विद्यालय, देवणी येथून झाली. रॅलीचा मार्ग विवेक वर्धिनी विद्यालय ते बोरोळ चौक, बसस्थानक, मुर्गी चौक, धनगर गल्ली, पोलीस स्टेशन, लासोना चौक मार्गे पुन्हा विद्यालय येथे संपला. या रॅलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात ‘एकता दौड’ आणि राष्ट्रीय ऐक्याच्या घोषणा असलेले फलक होते.
कार्यक्रमात पोलिस निरीक्षक भिमराव गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या ऐक्य, अखंडतेसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. रॅलीचा समारोप विवेक वर्धिनी विद्यालय परिसरात राष्ट्रीय एकता शपथ घेत करण्यात आला. या प्रसंगी पोलिस निरीक्षक भिमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वराडे, तहसीलदार वाडकर, सय्यद फारुख, निलेश कांबळे, कॉन्स्टेबल योगेश गिरी, सूरज सूर्यवंशी, मुनाफ शेख, प्रदीप गिरी, पवन गायकवाड, धुळशेट्टे आदींसह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.


0 Comments