लातूरमध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी; ५ ते ७ डिसेंबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा
लातूर : जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तायक्वांदो क्रीडापट्टुंकडून चित्त थरारक खेळ पहायला मिळणार असून 35 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे दिनांक ०५ ते ०७ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे दिनांक ०६ व ०७ डिसेंबर रोजी तायक्वांदोच्या फाईटचा थरार लातूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
तायक्वांदो या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन लातूर येथे करण्यात आले असून या स्पर्धेला माजी मंञी तथा लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने घेण्यात येत आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होऊन पदक प्राप्त केलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. अशी माहिती आशियाई तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षक तथा तायक्वांदो जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव यांनी दिली आहे.
३४ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा लातूर येथे यशस्वी संपन्न केल्यामुळे पुन्हा ३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी लातूर जिल्ह्याला मिळाली असून ती यशस्वी पार पडण्यासाठी जिल्हा संघटना तयार आहे. तीन दिवसीय स्पर्धेत निवास, भोजन व स्पर्धा आयोजन ही सर्व जबाबदारी जिल्हा संघटना पार पाडणार आहे. या कामी एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, श्रद्धा कुलकर्णी, जान्हवी मदने, अनुश्री कुलकर्णी, गीतांजली नागरगोजे, रागिनी क्षिरसागर, श्रावणी खडबडे, श्रृष्टी कांबळे, आरोही राऊतराव, श्रावणी मोरे, विश्वजित जाधव, आकाश मिरगे, बबन सुळे, अक्षय मिरगे हे यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.



0 Comments