निटूर येथे हजरत अब्दुल कादरी हुसेनी (र.अ.) यांचा उर्स शरीफ
निटूर : ता. निलंगा, जि. लातूर हजरत अब्दुल कादरी हुसेनी (र.अ.) यांचा उर्स शरीफ सध्या साजरा होत आहे. युवा उर्स कमिटी निटूरच्या वतीने हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेतून हा सोहळा आयोजित केला आहे.
सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी गुशुल तर. मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता इमामसाहेब गस्ते यांच्या घरातून संदल शरीफ निघून गावात भव्य मिरवणूक काढली जाईल. संध्याकाळी ५ वाजता संदल व चादर अर्पण करून सोहळा संपन्न होईल. २१ जानेवारी २०२६ संध्याकाळी ८ वाजता बाजार चौक, निटूर येथे कव्वालीचा भव्य मुकाबला होईल. चारसुंबा (बुधवार) रोजी अहमदनगर येथील शाहेद अजमेरी व रेश्मा ताज- मिरज यांचे कव्वाली मुकाबला व विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी फज्रनंतर जियारत व फातीया खानी होईल. यानंतर प्रसाद (तबुरुख) वाटप केले जाईल. सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम दावत व लंगर खाण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू-मुस्लिम बांधवांना संदल शरीफमध्ये सहभागी होऊन सवाबे दारैन प्राप्त करण्याचे आवाहन अध्यक्ष इसाक गस्ते व पदाधिकारी हैदर मोमीन, रफिक मुल्ला, अल्ताफ गस्ते, जमीर वाडीवाले, रेश्मा ताज मिरज, वाजीद तांबोळी, राजू येरोळे, खदीर गस्ते, ईलाही गस्ते, शाबुद्दीन गस्ते, महेबुब शेख, निहालपाथा मुल्ला, चाँदपाशा गस्ते, रसुल सरदार, इरफान शेख, ताहेर गस्ते, जमीर गस्ते, जलील शेख, इरफान गस्ते, अलिम गस्ते, मिनाज गस्ते यांनी केले आहे.



0 Comments