महाराष्ट्र विद्यालय, निटुर शाळेचा इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकाल
निलंगा : महाराष्ट्र विद्यालय निटुर शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविले आहे. या परीक्षेला एकूण ३४ विद्यार्थी बसले असून, सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत सोमवंशी श्रद्धा शिवराज, वैभव अरुण जगदाळे, राधिका अभय सोमवंशी आणि नम्रता शशिकांत शिंदे या चार विद्यार्थ्यांनी 'A' ग्रेड मिळविला. सहा विद्यार्थ्यांना 'B' ग्रेड तर उर्वरित २४ विद्यार्थ्यांना 'C' ग्रेड मिळाला.
या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, सहशिक्षक भोयबार, पाटील, नाईकवाडे, चव्हाण, विशाल जाधव, अनिल देशमुख, निटूरे राजेंद्र, भीमराव बयाजी हजारे आणि पालक शिवराज सोमवंशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


0 Comments