Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथे सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सव

निटूर येथे सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सव

निटुर : येथील महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

प्रथम मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुलींनी जिजाऊ व सावित्रीमाईंची वेषभूषा साकारली होती. जगदाळे श्रावणी, निटुरे समीक्षा, पाटील अक्षता, विद्या सोमवंशी, श्रद्धा सोमवंशी व कृष्णा निटुरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्या सोमवंशी व राधिका सोमवंशी यांनी जिजाऊ वंदना गाऊन अभिवादन केले. मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ व एच. एन. भोयबार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी एन. एम. पाटील, नाईकवाडे, जाधव, राजू निटुरे व अनिल देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' गीताने झाली.

Post a Comment

0 Comments