अल अमीन उच्च- माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
उर्दू माध्यमातून जिल्ह्यात सर्वप्रथम; शंभर टक्के निकाल
उदगीर:(प्रतिनिधी) राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी २०२० घेण्यात आलेल्या परीक्षेत शहरातील उर्दू माध्यमाची नामवंत शाळा म्हणून ज्याची ओळख आहे त्या अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा राखत कला व विज्ञान दोन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लावला आहे. परीक्षेत १०० विद्यार्थी बसले होते, सर्वच्या सर्व यशस्वी झाले असून, यातील चार विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. ३५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ५९ द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत यशस्वी झाले आहेत. *पठाण सिमरन फातेमा शब्बीर* या विद्यार्थिनीने ८३.५३% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. राजा पटेल अर्फिया बेगम अब्दुल वाहेद हिने ७८.७६% सिद्दीक़ी आएशा बेगम मुन्तजीब हिने ७६.७६% तर तंबोली आसमा नवाजुद्दीन हिने ७५.३८% गुण मिळवले आहेत.
विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टाबरोबरच शिक्षक वर्ग, प्राचार्य व संस्थेच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा आहे. या यशाबद्दल अल-अमीन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ईसा खान, सचिव शेख़ अकबर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य उस्ताद सय्यद सलीम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments