Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश



निलंगा:(प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १२ वी बोर्ड परीक्षेत गुणवत्तेची यशस्वी परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.२६ टक्के, कला शाखेचा ८१.२९ टक्के व एम.सी.व्ही.सी. .शाखेचा ९४.३३ टक्के निकाल लागला आहे. तसेच गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन आस्मिता शेषेराव जाधव हीने यश संपादन केले.


यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून मोहीनी तुकाराम काळे ८८.१५ टक्के प्रथम, खालसा अमरजीतसिंग पोतीवाल ८६.३० टक्के द्वितीय व अमीत दयानंद जाधव ८५.२३ टक्के तृतीय क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेतून विशेषप्राविण्यासह ३३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २२८ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत १२४ विद्यार्थी असे ३९६ पैकी ३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


वाणिज्य शाखेतून वैभवी नारायण जाधव ८७.८४ टक्के प्रथम, ऋषीकेश विलास पाटील ८७.३८ टक्के द्वितीय व राधा विक्रम चोपणे ८६.४६ टक्के तृतीय आलेली आहे. वाणिज्य शाखेतून विशेष प्राविण्यासह ६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ९१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ३९ असे १६९ पैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


कला शाखेतून हैदर सक्रोद्दीन शेख ८८.४६ टक्के प्रथम, क्षितीजा संजयराव हिबारे ८७.५४ टक्के द्वितीय व सुष्मा काशीनाथ बेलकुंदे ८५.५४ टक्के तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेतून विशेष प्राविण्यासह १६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ७२ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत ३८ विद्यार्थी असे १५५ पैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


एम.सी.व्ही.सी. शाखेतून राधा कमलाकर लोभे ८१.२३ टक्के प्रथम, आरती दत्तात्रय सुर्यवंशी ७९.५३ टक्के द्वितीय व वैष्णवी रविराज गड्डे ७८.६१ टक्के तृतीय क्रमांक मिळविला आहे. एम.सी.व्ही.सी. शाखेतून विशेष प्राविण्यासह ६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३३ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत ११ विद्यार्थी असे एकूण ५३ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, उपाध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, निलंगेकर, संस्थेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, प्रा. अशोक तुगावे, प्रा. सुर्यकांत वाघमारे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments