अहमदपुर:(प्रतिनिधी) काळेगाव ता.अहमदपुर येथील एस.ए जागीरदार कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी फेब्रुवारी - मार्च २०२० च्या झालेल्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९५.६१% लागला असून १३ मुले विशेष प्राविण्यासह व ५५ मुले प्रथम श्रेणीसह उतीर्ण झाले आहेत . महाविद्यालयातून
विज्ञान शाखेतून:-
प्रथम- शेख नुजहत फ़ातेमा जमील अहमद ८२.७६%
द्वितीय- सय्यद सबा अ. खदीर ८०.१५%
तृतीय -सय्यद अरफ़ात शेरअली ७५.६९%
कला शाखेतून अनुक्रमे
प्रथम- शेख सादिया सिकंदर ८५.८४ %
द्वितीय- शेख तबस्सुम यूनुस ८५.३८ %
तृतीय- मणियार नेहा हीराजी ८०.७६ %
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन व कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार, सचिव शुकुर जहागिरदार, हाफिज़ अ. लतीफ जागीरदार,फारूख जागीरदार.महाविद्यालयाचे प्राचार्य हबीब अबूबकर व सर्व प्राध्यापक , परिसरातील पालक, नागरिक आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
0 Comments