पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण
चाकूर:(तालुका प्रतिनिधी /सलीमभाई तांबोळी) कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.चाकुर पोलीसांनी चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाकुर शहरातील जुने बसस्थानक येथे नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे.सर्व बिट अंमलदार ग्रामीण भागात जाऊन गस्त घालत लॉकडाऊनचे कडक पालन करण्यासाठी रस्त्यावर विनाकारण दिसणाऱ्या कारवाई करीत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊने काटेकोरपणे पालन करण्यासाठी आहवान करण्यात येत आहे.चाकुर शहरात व तालुक्यात पोलीस आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत.येथील जुने बस्थानक जवळ पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड,उपनिरीक्षक खंडु दर्शने,पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे,पीराजी पुट्टेवाड,तानाजी आरदवाड,जोशी,आदिने कडक नाकाबंदी केली.चाकूर तालुक्यात आजपर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २३ झालेली आहे.लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दि.१५ जुलै ते दि.३० जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा केलेली आहे. या काळात चाकूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांनी सांगितले की,
अतिशय कडेकोट पद्धतीने हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्यामुळे जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दि.१५ जुलै ते दि.२० जुलै या काळात कोणत्याही प्रकारची दुकाना किराणा असो वा इतर अत्यावश्यक सर्व सेवा या पूर्णतः बंद राहणार आहेत. फक्त हॉस्पिटलच्या जवळील मेडिकल दुकाने ही २४ तास उघडी राहणार आहेत.दि.२१ जुलै ते दि.३० जुलै या काळात सर्व किराणा व मेडिकल दुकाने ही सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत उघडी राहतील.पण, ग्राहकांना दुकानांवर जाऊन वस्तु खरेदी करता येणार नाही.तर दुकानदारांनी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे सांगण्यात आले आहे.तसेच लॉकडाऊन काळात दुचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवास करता येणार नाही.तसे आढळून आल्यास, ५०० रु दंड आकारण्यात येणार आहे. तर विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीला देखील ५०० रु दंड आकारण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक, जयवंतराव चव्हाण यांनी सांगितले आहे. एकंदरीतच हा लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीचे असणार आहे.
0 Comments