ग्रा.पं. अलगरवाडी ला राज्यस्तरीय आदर्श ग्रा.पं. पुरस्कार
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) विकासाबाबत अलगवाडी म्हणून आलगरवाडी म्हणून अंख्या महाराष्ट्रात प्रसिध्द ग्रामपंचायतआहे.अनेक राज्यास्तरीय,विभागस्तरीय,जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये मराठवाडा विभागस्तरीय प्रथम व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानीत आदर्श गाव अलगरवाडी (ता.चाकूर) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (मुंबई) यांच्यावतीने दिला जाणारा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या अनेक ग्रामविकासाच्या कामाची दखल घेत सदरील पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील दोन वर्षाच्या काळात आदर्श सरपंच गोविंदराव माकणे व ग्रामसेवक प्रशांत राजे या जोडीने अनेक अशक्य ग्रामविकासाच्या संकल्पना गावात प्रत्यक्षात उतरविल्या आहेत. या सर्व ग्रामविकासाच्या कामांची दखल घेवुन हा पुरस्कार जाहीर केल्याचे जाहीर करण्यात आले. संपूर्ण राज्यातील प्रस्ताव स्वीकारल्यानंतर निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे. कारण फक्त दोन वर्षाच्या कार्यकाळात एवढ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या तेंव्हा हा आदर्श महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोना विषाणू साथरोगाच्या बाबतीत ग्रामपंचायतने राबविलेल्या उपाययोजनांची दखल तर खुद्द महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. पद्मश्री अॕड उज्वल निकम यांनी तर गावातील साचेबध्द विकास पाहुन स्वतःला अलगरवाडीचा ब्रॕण्ड अम्बेसेटर घोषीत केल. पद्मश्री डाॕ. विकास माहात्मे, जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, रिझर्व्ह बँकेच्या सदस्या श्रिमती चेतना सिन्हा मॕडम, यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे अनेक उच्च अधिकारी यांच्यासह इतर अनेक जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व अधिकारी यांनी गावाला भेट देवुन ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले आहे. कोरोना साथरोगाला गावात प्रतिबंध करण्यासाठी ग्रामसेवक स्वतः गावात गेल्या तीन महिन्यापासुन तळ ठोकून हजर आहे या शब्दात मा. ग्रामविकास मंञ्यांनी स्वतः कौतुक केल आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.विपीन इटनकर तर गावाचा उल्लेख अलगरवाडी. एक अलग वाडी असा करतात. दि.१९ डिसेंबर सप्टेंबर २०२० रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे सदरील पुरस्कार समारंभपुर्वक सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
0 Comments