Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यातील कोविड योध्दांचा भाजपाकडुन गौरव 

चाकुर तालुक्यातील कोविड योध्दांचा भाजपाकडुन गौरव 



डॉ.एन.जी.मिर्झा वैद्यकीय सेवेबदल सनमान


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) सध्या देशभारात कोविड- १९ चा कहर बरसत आहे.आख्य जगाला या विषाणूने हादरऊन टाकले आहे.महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने कोरोना बांधित रुग्ण झाले आहेत.आपल्या लातुर जिल्हात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.प्रशासनांने लॉकडाऊन केले.आता अॉनलॉक ३ चालु आहे.अशा महामारीच्या कठिण प्रसंगी चाकुर शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित असणारे डॉ.एन.जी.मिर्झा राञन दिवस आरोग्य सेवा देत आहेत.आपल्या हॉस्पीटल मधुन दररोज शेकडों पेशंटची तपासणी करुन त्यांच्या वर उपचार करीत आहेत.अविरत रुग्ण सेवा देत आहेत.


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोविड- १९ योध्दा गौरवपञ डॉ.एन.जी.मिर्झा यांना देण्यात आले.रक्षाबंधनाच्या पविञ पर्वावर कोविड- १९ संकट काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कोविड योध्दांना रक्षाबंधनाच्या पविञ पर्वा वर भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरविण्यात आले.


भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई हाक पाटील यांच्या सुचनेवरुन चाकुरचे सुप्रसिद्ध डॉ.एन.जी.मिर्झा यांना गौरवपञ देण्यात आले.यावेळी सौ.लताताई मुंडे ग्रा.प.सदस्य सांडोळ-माहाडोळ,भाजपा शहरध्यक्ष प्रशांत बिबराळे,भाजपा युवा नेते साई हिप्पाळे,गजानन करेवाड,कृष्णा मुंडे आदिच्या उपस्थिती देण्यात आले.


Post a Comment

0 Comments